उद्या म्हणजे ५ मे २०१२ ला नौशादजींना जाऊन ६ वर्षे होतील. ईस्लाम धर्मात पुण्यतिथी वगैरे असते की नाही ते माहिती नाही पण मी आणि माझे काही मित्र दरवर्षी जितक्या श्रद्धेने ३१ जुलैला रफींची पुण्यतिथी साजरी करतो तितक्याच श्रद्धेने गेली ४ वर्षे नौशादजींची पुण्यतिथीही साजरी करतो. साजरी करतो म्हणजे काय, एकत्र जमतो. त्यांची गाणी पहातो, ऐकतो, काही प्रमाणात म्हणण्याचाही प्रयत्न करतो. वैयक्तिक आयुष्यात माझ्यावर नौशादजींच्या संगीताचा जास्त पगडा आहे. मी जे काय थोडं-बहूत (लोकांच्या मानाने थोडं, माझ्या दृष्टीने बहूत
) शास्त्रिय संगीत शिकलो त्याला नौशादजींची गाणी (मुख्यतः रफीने गायलेली) गाण्याचा अट्टाहास कारणीभूत ठरला.
हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरवात नौशादजींनी केली. तांत्रीकदृष्ट्या सांगायचं झालं तर १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी (१९४४ - रतन, १९४६ - अनमोल घडी, १९५२ - बैजू बावरा, १९५७ - मदर ईंडीया आणि १९६० - मुघल-ए-आझम), १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटांचं संगीत नौशादजींचं होतं. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट आणि बैजू बावरा हे केवळ आणि केवळ नौशादजींच्या संगीताने तारले होते.
हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातला असा एकही राग नाही ज्यावर आधारित नौशादजींचं एकतरी गाणं नाही असं म्हटलं जातं. ही कदाचित त्यांच्या (माझ्यासारख्याच) चाहत्यांची अतिशयोक्तीही असू शकते. पण त्या मागे नौशादजींच्या अलौकीक प्रतिभेचे कौतूक आणि आदर आहे. रफी आणि नौशाद यांच्या स्नेहबंधाबद्दल मा.बो. वरील काही रसिक आणखी प्रभावीपणे लिहू शकतील. म्हणून मी तो भाग शक्यतो टाळतोय. पण नौशादजींच्या संगीतातून रफीला वेगळा काढणे केवळ अशक्य आहे. रफीच्या आवाजाच्या रेंजचा, त्याच्या क्लासिकल वरील हुकुमतीचा, वेगवेगळे प्रयोग करण्याच्या तयारीचा सर्वात जास्त आणि अप्रतिम वापर जर कुणी केला असेल तर तो नौशादजींनीच.
हिंदी चित्रपट संगीतातले काही ठळक आणि वेगळे प्रयोग करण्याचं श्रेय मात्र नौशादजींकडेच जातं. खरंतर शास्त्रिय संगीत हाच त्यांचा पाया असला तरी याही क्षेत्रातले बर्मनदादा, शंकर जयकिशन यासारख्या समांतर संगीतकारांची स्पर्धा त्यांना होतीच. पण या सर्वातूनही आपला बाज न बदलता वर्षानू वर्ष टिकून रहाणे या साठी मेहनत आणि सृजनशिलतेची आवश्यकता असते. पं. पलूस्कर आणि खाँसाहेब आमिरखान यासारख्या दिग्गजांना बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा मिनीटांच्या जुगलबंदीसाठी ( आज गावत मन मेरो झुमके) तयार करणे, हिंदी चित्रपट संगीतकारांना दारातही उभे न करणार्या खाँसाहेब बडे गुलाम अली खान यांच्याकडून मुघल-ए-आझम साठी चक्क दोन बंदिशी गावून घेणे, महेंद्र कपूर सारख्या गुणी गायकाला पहिली संधी देणे (सोहनी-महिवाल) ही आणि अशीच काही नौशादजींची ठळक योगदानं.
बैजू-बावरा हा चित्रपट तर त्यांनी अक्षरश: निर्धाराने (विडा उचलल्यासारखा) केवळ आपल्या संगीताच्या जोरावर हिरक-महोत्सवी केला. या चित्रपटाचे निर्माते जरी प्रकाश भट असले तरी या चित्रपटाची खरी निर्मीती नौशादजींचीच होती. आपल्या मित्रासाठी त्यांनी दिलेले हे योगदान होते. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. उडन खटोला हे त्यातले ठळक नाव. गुलाम मोहम्मद यांनी काही काळ त्यांच्या सहाय्यकाची भुमिका केली होती. त्यामुळेच पुढे स्वतंत्र संगीतकार म्हणून गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या पाकिजाचे पार्श्वसंगीत गुलाम मोहम्मद यांच्या निधनानंतर नौशादजींनी पुर्ण केलं. पाकिजा न पाहिलेल्यांना (माबो वर असा माणूस विरळाच) या पार्श्वसंगीताची गंमत कदाचित कळणार नाही. कारण चित्रपटाच्या संगीताच्या एल.पी. रेकॉर्डस, कॅसेटस, सी.डी.ज वर जितकी गाणी आहेत तितकीच किंबहून थोडी जास्तच गाणी (लताच्या स्वर्गिय आवाजात) या पार्श्वसंगीतात लपली आहेत जी केवळ चित्रपट पाहतानाच ऐकायला मिळतात.
पण नौशादजींच्या प्रयोग करण्याच्या हौसेमुळे काही वेळेला त्यांचं संगीत हे केवळ ऐकायला छान आणि म्हणायला कठिण बनलं. सामान्य संगीतरसिकांना काहीसं अडचणीचं भासू लागलं. रफीला देखील याचा काही वेळेला त्रास झाला. उदा. बैजू बावरा मधलं "ओ दुनिया के रखवाले" गाताना ताण असह्य होऊन रफीच्या नाकाचा घुळणा फुटला आणि रक्त वाहू लागलं. पण त्याही स्थितीत त्याने ते गाणं पुर्ण केलं. तिच गोष्ट मुघल-ए-आझम मधल्या "जिंदाबाद ऐ मुहोब्बत जिंदाबाद" या गाण्याची. त्या गाण्याच्या तिसर्या कडव्यातली शेवटची ओळ - जिसके दिलमें प्यार न हो, वो पत्थर है ईन्सान कहाँ - हे म्हटल्यानंतर रफी अक्षरशः ओरडलाय.
नौशादजींचं निधन जरी २००६ साली झालं असलं तरी १९६८ नंतर त्यांचं संगीतक्षेत्रातलं योगदान नगण्यच होतं. एकाएकी प्रतिभेचा झरा असा कसा आटू शकतो हे एक कोडंच आहे. पण जेवढं काही त्यांनी त्या २६ वर्षात दिलयं ते आणखी १०० वर्षं तरी आनंद देत राहील हे नक्की.
आणखी काही वैशिष्ट्य -
१. एखादे गाणे जर ३ कडव्यांचे असेल तर पहिल्या आणि तिसर्या कडव्याची चाल सारखी ठेवून मधले कडवे वेगळ्या चालीत ठेवण्याचा ट्रेंड बर्याच गाण्यांमधून आपल्याला दिसतो. याची पहीली सुरवात करण्याचं श्रेय नौशादजींना जातं.
२. नौशादजींच्या हसर्या, नर्मविनोदी स्वभावाचा उल्लेख वर एका प्रतिसादात आलाय. "कोहिनूर" च्या चित्रीकरणाच्या वेळी नौशादजींचा हा पैलू पाहीला मिळाला. हा चित्रपट (आणि आझाद - सं. सी.रामचंद्र) हा दिलीपकुमार यांना त्यांची ट्रॅजेडीकिंग ह्या त्यांच्या ईमेजमधून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडला. हा एक पोशाखी चित्रपट होता (राजे-रजवाड्यांच्या काळातला). पण याच्या संवादांमधे ईंग्लीश शब्दांचा, वाक्यांचा सर्रास वापर केला गेला आहे. त्यामुळे पहिल्या फ्रेमपासून एक हलका-फुलका चित्रपट बनला. यामागे प्रेरणा नौशादजींचीच होती. निर्माता आणि दिलीपकुमार हे दोघेही त्यांचे मित्र असल्याने त्यांनीही ही कल्पना उचलून धरली होती. या चित्रपटातली सगळीच गाणी अप्रतिम. पण त्यातही "ढल चुकी शाम-ए-गम" मला जास्त आवडतं ते त्यातल्या ताल आणि चालीच्या प्रयोगामुळे. तिनही ड्युएट्स, रफीची तीन सोलो आणि उस्ताद विलायतखान यांची सतार - सगळंच दैवी. या चित्रपटासाठी दिलीपकुमार सहा महिने सतार वादन शिकत होते.
३. मुगल-ए-आझम मधले "जिंदाबाद जिंदाबाद" हा एक असाच प्रयोग होता. या गाण्याच्या रेकॉर्डींगचा एक सुंदर फोटो माझ्याकडे होता. तर चाळीस स्त्री-पुरुषांचा कोरस आणि रफी यांच्यासाठी केवळ एकच हँगीग माईक लावून या गाण्याचं रेकॉर्डींग केलं होतं. या गाण्याच्या शेवटी कोरसच्या वरच्या आवाजात रफी जेव्हा "जिंदाबाद जिंदाबाद" म्हणतात तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे येतात. नौशादजींकडे रफी जेवढा "ओरडलाय" ना तेवढा शम्मी कपूरसाठीही ओरडला नसेल. याचं आणखी एक उदाहरण - गंगा जमनातलं "नैन लड जई है" चा शेवट.
४. "पालकी" हा चित्रपट नौशादजींची स्वतःची निर्मीती होती. या मधे मात्र त्यांनी प्रायोगीकतेचा अतिरेक केला आहे (हे माझं वैयक्तिक मत आहे). याचं उदाहरण म्हणजे रफींचं कधीही न विसरता येणारं सोलो - कल रात जिंदगी सें मुलाकात हो गयी. चाल किती अनवट असावी की ध्रुवपद सोडलं तर एकही ओळ दुसरीसारखी नाही.
५. "आदमी" हा त्यांच्या उतरतीच्या काळातला चित्रपट (असावा). या मधे त्यांनी रफी आणि तलत च्या आवाजात एक अप्रतिम ड्युएट रेकॉर्ड केलं होतं - कैसी हसीन आज यें, तारोंकी रात है. पण दुर्दैवाने शुटींगच्या वेळी काहीतरी गडबड झाली (कोणी म्हणतात की मनोजकुमार ने केली) आणि प्रत्यक्ष पडद्यावर हे गाणं रफी आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात आहे. अर्थात महेंद्र कपूरने ही ते चांगलंच म्हटलं आहे. पण मी जेव्हा ओरीजीनल ऐकतो तेव्हा मला तलतचं जास्त चांगलं वाटतं.
६. राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला-सिमी गरेवाल यांचा "साथी" हा मात्र त्यांची प्रतिभा त्यांना सोडून जात असल्याचा पुरावा देतो. याही चित्रपटातली गाणी चांगलीच होती. पण राजेंद्रकुमार साठी मुकेशचा वापर आणि केवळ शंकर-जयकिशनच्या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी वापरलेलं अतिरिक्त ऑर्केस्ट्रेशन - ऐका "मेरा प्यार भी तु है, ये बहार भी तु है" हे ड्युएट. एके काळी अगदी कमी वाद्यवापर करून केवळ आपल्या चालींनी रसिकांना खिळवणार्या या प्रतिभावंताची काळाच्या ओघात टिकण्यासाठी केलेली ही धडपड होती.

बाकी नौशादजी स्वतः शायरी करत. त्याचं एक उदाहरण म्हणजे रफींच्या निधनानंतर त्यांनी रचलेले शेर. त्यातला एक साधारण असा होता - गायकी था हुस्न-ए-फन तेरा रफी, तेरे फनपें हमें नाज है, मेरी सांसोमें तेरी आवाज है, मेरे गीतोंमे तेरी आवाज है !
चित्रपटसंगीतातील (पडद्यावरील सादरीकरणातील) एका आणखी गोष्टीचा पहिलटकराचा मान नौशादजींकडे जातो. हिंदी चित्रपटातील नायक पहिल्यांदा पियानोवर बसला तो नौशादजींच्या संगीतामध्येच. चित्रपट होता मेहबूबखान यांचा "अंदाज" आणि गाणे होते "तु कहें अगर जिवनभर मै गीत सुनाता जाऊं". अर्थात या मागे मेहबूबखान यांचीच कल्पना होती. पियानोचा त्या चित्रपटातील एका पात्रासारखा वापर केला गेला आहे. ईतके त्याला महत्व आहे. तर सांगायची गोष्ट अशी की त्यापुर्वीही संगीतामधे पियानोचा वापर झालाही असेल. पण या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे पियानो वाजवणारा नायक आणि पियानोच्या दर्शनी भागाचा स्टँड सारखा वापर करत त्यावर दोन्ही हाताची कोपरे टेकवून नायकाकडे कौतूक + प्रेमाने बघणारी नायिका हा रोमँटीसिझमचा नवा फॉर्म्युला एवढा लोकप्रिय झाला की त्यानंतर अनेक वर्षे कोणीही ऐरागैरा नत्थुखैरा उठायचा / उठायची आणि सरळ पियानो "बडवत" सुटायचे. पियानो हे खरंतर कष्टसाध्य वाद्य आहे. पण हिंदी चित्रपटात त्याचा उपयोग ९९% वेळा "सुरवाद्य" नसून "तालवाद्य" असल्यासारखा तो "बडवला" गेला आहे. (पहा - गाणे "दिल का सुना साज तराना ढुंढेगा" - सादरकर्ते श्री. शत्रुघ्न सिन्हा
) ! आणि हे अगदी आता-आता पर्यंत चालत आले आहे.
नौशादजींची आणखी एक देणगी म्हणजे गाण्यांमधे त्यांनी अॅडलीब चा केलेला प्रभावी वापर. याची सुरवात झाली "दिदार" मधल्या "हुवे हम जिनके लिए बरबाद" ने. त्या गाण्याच्या सुरवातीचा "असिर पंजाए, अहदे शबाब" ही अॅडलीब गाण्याईतकीच लोकप्रिय ठरली होती. (विषयांतर होईल, पण ऑर्केस्ट्रात गाणार्या कलाकारांसाठी ही एक मोठी देणगी ठरली. साधारणतः व्हॉईस ऑफ रफी म्हणून गाणारे बहुतांश कलाकार एंन्ट्रीला अशी गाणी निवडतात. म्हणजे स्टेजवर काळोख आणि विंगमधूनच वर दिलेली किंवा "चले आज तुम जहांसे" ही "ओ दुरके मुसाफिर" ची अॅडलीब गायची आणि मग स्टेजवर पुढचे गाणे गात-गात यायचे - हमखास टाळ्या वसूल) 
*********************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा