साल १९६४. भारत-चीन १९६२ च्या युद्धाच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. निर्माता-दिग्दर्शक चेतन आनंद यांचा या युद्धाच्या पार्श्वभुमीवरचा "हकिकत" प्रदर्शित झाला. एका युद्धपटाला मिळतो तितकाच प्रतिसाद या चित्रपटाला सुरवातीला मिळाला. त्यावेळेला आजच्या सारखी प्रदर्शनाआधीच संगीत प्रसिद्ध करण्याची पद्धत रुळली नव्हती. पण लेह-लद्दाखचे खर्या युद्धभुमीचे (रमणीय तरी अतिशय बिकट अशा लोकेशन्सवर) केलेले चित्रीकरण, रुढार्थाने धर्मेंद्र-प्रिया राजवंश हे जरी नायक-नायीका असले तरी खरा नायक या चित्रपटाचा विषय आणि त्याचे टेकींग, बलराज सहानी, विजय आनंद, जयंत आणि ईतर मातब्बर अभिनेत्याच्या अभिनयाची जुगलबंदी आणि अबोव्ह ऑल मदन मोहन यांचे संगीत. "होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा", "मै ये सोचकर उसके दरसें उठा था", "जरासीं आहट होती है तो दिल सोचता है" या गाण्यांनी रसिकांना रिझवलं. एका शोकांतीके बरोबर चित्रपट संपतो. प्रेक्षक जड अंतकरणाने उठणार ईतक्यात युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या प्रेतांवर, त्यांच्या वस्तुंवर कॅमेरा फिरतो आणि पार्श्वभुमीवर गाणे सुरु होते - "कर चलें, हम फिदा, जान-ओ-तन साथीयों, अब तुम्हारे हवालें, वतन साथीयों". मदन मोहनचं संगीत, रफीचा आर्त पण समज देणारा स्वर आणि कैफी़ आझ़मी यांचे जबरदस्त शब्द. प्रेक्षागृहातून बाहेर पडू पहाणारा प्रेक्षक मटकन खाली बसतो आणि त्या गाण्याने एक अख्खी पिढी भारून जाते.
"सांस थमती गयीं, नब्ज जमतीं गयीं
फिरभी बढतें कदम को न रुकने दियां
कट गयें सर हमारें तो कुछ गम़ नहीं
सर हिमालय का हमनें न झुकनें दिया
आज धरती बनीं है, दुल्हन साथीयों
अब तुम्हारें हवालें, वतन साथीयों"
फिरभी बढतें कदम को न रुकने दियां
कट गयें सर हमारें तो कुछ गम़ नहीं
सर हिमालय का हमनें न झुकनें दिया
आज धरती बनीं है, दुल्हन साथीयों
अब तुम्हारें हवालें, वतन साथीयों"
माझी आणि कैफ़ीजींच्या काव्याची ही पहीली ओळख. वास्तविक हक़िकतच्या खुप आधीपासून कैफ़ीजी लिहीत होते. १९५२ च्या बुझ़दिल पासून. गुरुदत्त यांच्या १९५९ च्या "कागज़ के फुल" या चित्रपटाने कैफ़ी आझ़मी हे नाव खर्या अर्थाने लोकांसमोर आलं. चित्रपट अयशस्वी ठरला (किंवा ठरवला) आणि त्याचे अपयश हे गुरुदत्त यांच्या अकाली मृत्युला कारणीभुत / निमित्त ठरले. असे असले तरी या चित्रपटाच्या गाण्यांनी लोकांना रिझवले. "वक्त नें किया, क्या हसीं सितम", "देखी जमानें की यारी, बिछडें सभीं बारी-बारी" या गाण्यांना प्रचंड लोकाश्रय लाभला. कैफ़ीजींचा मुळ पिंड हा एका कवीचा/शायराचा होता. त्यामुळे त्यांच्या गैरफिल्मी गझल, उर्दु काव्य यांना आधीपासूनच रसिकाश्रय लाभला होता. मी मात्र ईथे फक्त त्यांच्या हिंदी चित्रपटसंगीतातल्या योगदानाचाच विचार करतो आहे. हिर-रांझा या डोळ्यांवर अत्याचार करणार्या (राजकुमार-प्रिया राजवंश) चित्रपटात कैफ़ीजींच्या काव्यात्मक संवादांनी आणि गाण्यांनी थोडीफार जान फुंकली होती. पण काव्यात्मक संवाद पुर्ण चित्रपटभर हा खरोखरच कंटाळवाणा प्रकार होता. त्यातली "मिलो न तुम तो हम घबरायें" आणि "यें दुनियां, ये महफ़ील, मेरे काम की नही" (सं. मदन मोहन) ही गाणी लोकप्रिय ठरली.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे २७ मे १९६४ रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेचे बी.बी.सी. ने केलेले चित्रीकरण फिल्म्स डिव्हीजन कडे होते. दिग्दर्शक राज मरब्रोस यांना ते चित्रीकरण आपल्या चित्रपटात वापरण्याची ईच्छा होती. त्यांनी ती संगीतकार मदन मोहन यांच्याकडे व्यक्त केली. चित्रपट होता "नौनीहाल". प्रकरण सरकार-दरबारी रुजू झाले. पण भारताचे पहिले पंतप्रधान. त्यांच्या अंत्ययात्रेचे चित्रीकरण व्यावसायिक चित्रपटात वापरणे ही व्यवसायाची क्लुप्ती असली तरी या प्रसंगाचे गांभिर्य राखणे जरूरी होते. मदन मोहन यांनी आपले मित्र कैफ़ीजींना पाचारण केले. त्याच्या कडून एक सुंदर गाणे लिहून घेतले. त्याला अप्रतिम चाल बांधली. आणि केवळ त्या गाण्याच्या जोरावर ते चित्रीकरण चित्रपटात वापरण्याची परवानगी मिळवली. ते गाणे होते -
मेरी आवाज सुनो, प्यार का राग सुनो
मैने ईक फुल जो सिनेंसे लगा रखा था
उसके परदेंमे तुम्हें दिल़सें लगा रखा था
था जुदा सबसें मेरें ईष्कका ईजहार सुनो
मैने ईक फुल जो सिनेंसे लगा रखा था
उसके परदेंमे तुम्हें दिल़सें लगा रखा था
था जुदा सबसें मेरें ईष्कका ईजहार सुनो
एका फालतू चित्रपटाला या गाण्याने आणि मदन मोहन यांच्या संगीताने थोडा काळ का होईना जगवलं. याच चित्रपटातले "तुम्हारी जुल्फं के सायें में शाम कर लुंगा" हे गाणेही गाजले.
कैफीजींची काही लोकप्रिय गाणी खालीलप्रमाणे -
१. चलतें चलतें युंही कोई मिल गया़ था - पाकिझा
२. चलो दिलदार चलो - पाकिझा
३. आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे - पाकिझा
४. थाडे रहीयों ओ बांके यार - पाकिझा
(पाकिझा चा उल्लेख मी मुद्दाम टाळलाय कारण इतरत्र याविषयी भरपूर लिहीलं गेलं आहे)
२. चलो दिलदार चलो - पाकिझा
३. आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे - पाकिझा
४. थाडे रहीयों ओ बांके यार - पाकिझा
(पाकिझा चा उल्लेख मी मुद्दाम टाळलाय कारण इतरत्र याविषयी भरपूर लिहीलं गेलं आहे)
५. बहारों, मेरा जिवन भी सवारों - आखरी़ खत
६. धीरें धीरें मचल, ऐ दिल-ए-बेकरार - अनुपमा
७. कुछ़ दिलनें कहां - अनुपमा
८. जानें क्या ढुंढती रहती है ये आँखें मुझ़में - शोला और शबनम़
९. जीत ही लेंगे बाजी हम तुम - शोला और शबनम़
१०. हर तरफ अब यही अफसाने है - हिंदुस्थान की कसम
११. तुमं बिन जिवन कैसे जिवन - बावर्ची (मन्ना डें यांचे अप्रतिम गाणे)
१२. भोर आयी गया अंधीयारा - बावर्ची
१३. काहें कान्हा करत बरजोरी - बावर्ची
१४. ये नयन डरें डरें - कोहरा
१५. झुम झुम ढलतीं रात - कोहरा
१६. तुम जों मिल गयें हो - हसतें जख्म़
१७. बेताब़ दिलकी, तमन्ना यहीं है - हसतें जख्म़
६. धीरें धीरें मचल, ऐ दिल-ए-बेकरार - अनुपमा
७. कुछ़ दिलनें कहां - अनुपमा
८. जानें क्या ढुंढती रहती है ये आँखें मुझ़में - शोला और शबनम़
९. जीत ही लेंगे बाजी हम तुम - शोला और शबनम़
१०. हर तरफ अब यही अफसाने है - हिंदुस्थान की कसम
११. तुमं बिन जिवन कैसे जिवन - बावर्ची (मन्ना डें यांचे अप्रतिम गाणे)
१२. भोर आयी गया अंधीयारा - बावर्ची
१३. काहें कान्हा करत बरजोरी - बावर्ची
१४. ये नयन डरें डरें - कोहरा
१५. झुम झुम ढलतीं रात - कोहरा
१६. तुम जों मिल गयें हो - हसतें जख्म़
१७. बेताब़ दिलकी, तमन्ना यहीं है - हसतें जख्म़
अलीकडच्या काळातली "अर्थ" ची गाणीही त्यांचीच होती.
कैफीजींवर काही लिहावं की लिहू नयें या द्बिधा मनःस्थितीत मी होतो. याचे एकमेव कारण त्यांच्या मुलीचा - शबानाचा - मला न आवडणारा सेक्युलर (आणि म्हणून कुरुप) चेहरा. पण वर दिलेल्या गाण्यांच्या यादीवर नजर टाकली की लक्षात येईल, की त्यांची आठवण न करणे हा स्वतःवरतीच अन्याय झाला असता. कारण मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचही योगदान आपल्यासाठी ईतर कुठल्याही महान कवीईतकंच मोठं आहे.
"खिंच दो अपनें खुन सें जमींपर लकींर
ईस तरफ आने पायें ना रावण कोई
तोड दो हाथ, अगर हाथ उठने लगें
छुने पायें ना सीता का दामन कोई"
ईस तरफ आने पायें ना रावण कोई
तोड दो हाथ, अगर हाथ उठने लगें
छुने पायें ना सीता का दामन कोई"
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाची आठवण १९६४ मध्येच करून देणार्या कैफीजींचा एवढा तरी सल्ला आपल्या आंधळ्या न्यायव्यवस्थेने मानला असता ना तरी आजच्या सारखी विदारक परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला दिसली नसती. पण "वक्त नें कियां, क्या हसीं सितम, तुम रहें ना तुम, हम रहें ना हम" हे स्वतःचेच काव्य जगत असल्यासारखे कैफीजीं जिवनाच्या अंतीम टप्प्यात (कदाचित मुलीच्या आहारी जाऊन) एका ठराविक गटाची भलामण करताना दिसावे हे दुर्दैव.
या दर्जेदार गीतकाराचा उद्या १० मे रोजी १० वा स्मृतीदिन. त्या निमित्त कैफीजींना मानवंदना ! 
***********************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा