ही कविता खरंतर २०१० मधली. पण आज माझ्या दिवंगत
मित्राच्या स्मृती निमित्त माझ्या ब्लॉगवर वर टाकत आहे. यामध्ये काव्य
वगैरे शोधण्याचा कुणी प्रयत्न करु नये. पण शेवटच्या चार ओळी मात्र शब्दश:
खर्या आहेत.
एक होता मित्र माझा नाव त्याचं डी.जे.
त्याच्या मनस्वी वक्तव्यांवर मारायचो मी पीजे
म्हणायचा - माझं आता एकच मिशन
घरा-घरांतल्या मना-मनात रुजवायचे आहेत "शंकर-जयकिशन"
हे असलं काही ऐकलं की वाटायचं - अरे हा तर नादखुळा
पण आज लक्षात येतयं
हत्ती जोखु पाहणार्या सात आंधळ्यातला मी तर एक आंधळा
फार नाही जेमतेम चारेकच वर्ष असतील झाली
पहील्या दुसर्या भेटीतच त्याने माझ्या गर्वाचं घर केलं खाली
म्हणायचा - मला संगणकाची एक कळ सुद्धा येत नाही दाबता
गरजच नव्हती त्याला त्याची,
कारण सरस्वतीचा त्याच्या जिभेवर होता राबता
दिवस-वर्ष कशी भराभर गेली
आणि एक दिवस ती बातमी आली
त्याच्या मुलीचा सुंदर मुखचंद्रमा त्या दिवशी काळवंडला
जेव्हा तिच्या समोरच तिचा बाबा बोलता-बोलता कलंडला
वहिनींनी केला आक्रोश, डॉक्टरांच्या फौजेस कामाला जुंपले
सर्वांचा मिळून एकच निष्कर्ष आला
डी.जे. च्या मृत्युचे एकमेव कारण "श्वासच संपले"
डी.जे. गेला, वाईट झालं, जनांमधे झाली थोडी हळहळ
आणि मग सुरु झाली नेहमीचीच धावपळ
तीच गाडी, तोच डबा, सारे काही तेच तेच
रोजच्या जगण्याभोवती परिस्थितीचे पेच तेच
तु जाऊन आता दिवस उलटले तीन शंभर
पण अजुनही मोबाईलमधे जपला आहे तुझा नंबर
तु गेल्याने फार काही नाही घडले
म्हणजे बघ एवढे दिवस उलटले
तरी एकही गाणे नाही गुणगुणले
ती धुळ खाणारी संवादिनी, तो गंजु पाहणार्या तारांचा तानपुरा
सगळे बघतात माझ्या कडे केविलवाणे
मित्रा, तु गेल्यावर असे हरवले सुर, हरवले गाणे !
-
(डी. जे. = दिपक जामखेडकर - मृत्यु - ७ ऑक्टोबर २००९)
(मायबोलीवरून पुनःप्रकाशित)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा